उद्देश

· एमटीएस ऑलंपियाड परीक्षेचा उद्देश –

* महाराष्ट्रराज्‍यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळामध्ये अध्ययन करणाऱ्या कुशाग्र बुद्धिच्‍या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्राथमिक वर्गापासूनच त्‍यांच्‍या बुध्दीला चालना दिली तर त्‍यांच्‍या ज्ञानाच्‍या कक्षा रूंदावतील त्‍यामुळेच ग्रामिकण व शहरी भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन गुणवत्‍तेच्‍या निकषांवर त्‍यांना पारितोषिकाच्‍या स्‍वरूपात, स्‍कॉलरशिपच्‍या (शिष्यवृत्‍ती ) स्‍वरूपात,मेडलच्‍या स्‍वरूपात किंवा सन्‍मानचिन्‍हाच्‍या (ट्रॉफिच्‍या) स्‍वरूपात केंद्रस्‍तरावर तसेच राज्‍यस्‍तरावर प्रोत्‍साहन देणे हा एमटीएस ऑलंपियाड परीक्षेचा महत्‍वाचा उद्देश आहे.

* महाराष्ट्रराज्‍यातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळामध्ये अध्ययन करणाऱ्या कुशाग्र बुद्धिच्‍या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्‍या माध्यमातूनच शासनाच्‍या शिष्यवृत्‍ती परीक्षेची , एनटीएस परीक्षा, केंद्रीय स्‍पर्धा परीक्षा , लोकसेवा आयोगाच्‍या परीक्षा यासारख्या स्‍पर्धात्‍मक परीक्षांमध्ये भाग घेण्याची क्षमता विकसित करणे हा एमटीएस ऑलंपियाड परीक्षेचा उद्देश आहे.

* पालकांनी स्‍पर्धा परीक्षाचे महत्‍व ओळखून आपल्‍या पाल्‍यास एमटीएस ऑलंपियाड परीक्षामध्ये सहभागी करून घ्यावे.

Comments are closed.